नवी दिल्ली : युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरु आहे. यात युक्रेनमध्ये अनेक भारतीय अजून अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनियन सैन्याकडून सतत गोळीबाबत, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. यात अनेक युक्रेनच्या सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाही भारतीयच्या मृत्यूची बातमी समोर आली नव्हती. मात्र आजची ही बातमी खळबळ माजवणारी आहे.