नवी दिल्ली : देशात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहे. त्यातच रशिया-युक्रेन युद्धाचा थेट परिणाम देशभरातील वस्तूंवर दिसून आला. अशातच आज मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ही वाढ करण्यात आली.
आज 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. त्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०५ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती सिंलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.७ मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची वाढ
यावेळीही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 19 किलोचा LPG सिलेंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून मुंबईत 1857 रुपयांऐवजी 1963 रुपयांना मिळणार आहे. तर, दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता व्यावसायिक सिलिंडर 1987 रुपयांऐवजी 2095 रुपयांना मिळणार आहे.