मुंबई : काल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. केंद्राकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप एकीकडे महाविकास आघाडीमधील नेते करत आहेत, तर दुसरीडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आणखी बारा जण आहेत, जे जेलमध्ये जातील, असं म्हटलंय.यावेळी किरीट सोमय्या यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधलाय.
नवाब मलिकांच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यभर निदर्शनं केलीत. याबाबत पत्रकारांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की,…एकूण बारा जण लाईनमध्ये आहेत. मला सकाळी एका पत्रकारानं विचारलं, आता कुणाची बारी आहे? त्याला मी म्हणालो, आता चिट्ठी काढावी लागेल. आतापर्यंत दोन गेले.
हे देखील वाचा :
TMC खासदार नुसरत जहाँने ओलांडली हॉटनेसची हद्द, दिली बोल्ड पोझ
युक्रेन-रशिया तणावामुळे गोल्ड-क्रूडसह अनेक वस्तू महागल्या
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार
रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या
दहांवरची चौकशी आणि तपास सुरु आहे. माझी वक्तव्य भविष्यवाणी नाहीये. उद्धव ठाकरेंचा घोटाळाही सिद्ध झालाय. पण मुख्यमंत्री गप्प बसले. हिंमत असेल तर उत्तर द्या, मुख्यमंत्रीसाहेब! तुमच्या बायकोचं 2019चं पत्र खरं की 2021चं पत्र खरं, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्यामुळे आंदोलन करु नका.