मुंबई : देशासह राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बहुतांश राज्यांमध्ये नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मार्चपासून राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. परंतु मास्क लावणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने निर्बंध कमी करा, अशी सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर राज्य सरकार निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात असून, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे लवकरच शंभर टक्के आसन क्षमतेने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक मार्चपासून थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा विश्वास थिएटर व्यावसायिकांना वाटत आहे. सरकारने निर्णय घेतल्यास मार्च २०२० नंतर राज्यात पहिल्यांदाच थिएटर शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील.
हे देखील वाचा :
मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पीएफ खात्यांवरही लागू होणार कर, जाणून घ्या कोणाला बसणार फटका?
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा
सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल
RBI कडून ‘या’ तीन बँकांना दंड! यामध्ये तुमची बँक तर नाहीना?
राजेश टोपे यांनी केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्राचा संदर्भ दिला. त्यात राज्यांना त्यांच्या भागातील कोविड परिस्थितीत सुधारणा लक्षात घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास, सुधारणा करण्यास किंवा निर्बंध दूर करण्याससंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. टोपे म्हणाले की राज्यातील कोविड-19 कर्मचारी वर्गही निर्बंध शिथिल करण्याच्या बाजूने आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे. पुढच्या महिन्यापासून निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळेल अशी मला आशा आहे, असे टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘पत्रात केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की सर्व राज्यांनी निर्बंध कमी करावेत आणि लसीकरणासोबतच लोकांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास प्रोत्साहन द्यावे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे सुरू ठेवावे. महामारीच्या काळात आपण अशी निर्बंध त्वरित थांबवू शकत नाही. परंतु निर्बंध कमी करण्याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेईल’, असे टोपे म्हणाले.