आओ हुज़ूर तुमको, सितारों में ले चलूँ… या हिंदी सिनेमाच्या गाण्यावर सैराट फेम मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) ने डान्स केला असून हा व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक देखील केलं आहेत. रिंकू राजगुरू नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. यापूर्वी देखील तिने सोशल मीडियावर आपल्या फॅनसाठी अनेक व्हिडीओ व फोटोज् शेअर केले आहे.
आओ हुज़ूर तुमको, सितारों में ले चलूँ… हे गाणं आहे ‘किस्मत’ या हिंदी चित्रपटातलं… सन १९६८ साली रिलीज झालेल्या या चित्रपतील हे गाणं खूप गाजलं होतं. गायिका अशा भोसले यांनी हे गाणं गायलं होतं. मराठी अभिनेत्री रिंकू ने या गाण्यावर डान्स करीत सुंदर अदाकरी सादर केल्याने तिच्या चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे.
रिंकू सोशल मीडियावरही सक्रीय असून तिच्या कामासोबत तिच्या आयुष्यातील काही क्षणचित्रेही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.अभिनेत्री रिंकू राजगुरूने कमी कालावधीत आपल्या कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केलंय. सैराट मराठी चित्रपटातून तीन आपल्या अभिनय कारकीर्दला सुरवात केली असून तिने कमी कालावधीतीत मोठं यश मिळवलं आहे.
https://www.instagram.com/reel/CaEYNAvDQOM/?utm_source=ig_web_copy_link