तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज भेट होऊन देशाच्या राजकारणावर चर्चा झाली या चर्चेच्या बातम्या माध्यमासमोर आल्यानंतर राज्यातल्या राजकारणात विविध चर्चा सुरु झाल्या असून येत्या काळात भाजपच्या अडचणी वाढतील का? असा प्रश्न समोर येतं आहे तर दुसरी कडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार विरोधात आघाडीचा प्रयत्न स्वागतार्थ असल्याचं म्हटलं आहे तसेच हा प्रयत्न, आघाडी काँग्रेस शिवाय शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकार विरोधात आघाडीचा प्रयत्न स्वागतार्ह आहे, पण काँग्रेस शिवाय ते होऊ शकत नाही. pic.twitter.com/UfVlzWRBT4
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 20, 2022
देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होत असल्याचा दिला नारा…
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.यावेळी आमच्यात देशाच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असून देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे असा नारा दोन्ही नेत्यांनी दिला. तसेच इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही आम्ही भेटणार आहोत अस चंद्रशेखर राव यांनी म्हंटल आहे.
आम्ही दोघं भाऊ लागतो, कारण आमची हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. त्यामुळे एकत्र काम करावे लागते, पुढेही एकत्र काम करू असे त्यांनी म्हंटल. आज ज्या पद्धतीने देश चालला आहे, त्यात बदल झाला पाहिजे.देशात एका मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. असे म्हणत देशातील परिवर्तनाची ही सुरुवात आहे असं चंद्रशेखर राव यांनी म्हंटल आहे.