जळगाव (प्रतिनिधी) : खान्देशातील विविध लोककलेच्या जतन व संवर्धना सोबतच वहीगायन या लोककलेला खान्देशातील अस्सल लोककला म्हणून राजमान्यता मिळावी या साठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन २० फेब्रुवारीला जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येत आहे.
खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उदघाटन जळगाव जिल्हयाचे पालक मंत्री ना गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते होणार आहे या प्रसंगी जळगावचे आमदार राजुमामा भोळे महापौर जयश्री ताई महाजन, वृध्द कलावंत मानधन समिती चे अध्यक्ष गजानन महाराज वरसाडेकर जेष्ट लोककलावंत संभाजीराजे जाधव अदि मान्यवर उपस्थित रहाणार आहे
जीवन गौरव पुरस्कार जाहीर
खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्यावतीने या वर्षापासून लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत लोककलावंताना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे या वर्षीचा वहीगायन क्षेत्रातील पुरस्कार स्व प्राचार्य किसन पाटील स्मृती वहीगायन जीवन गौरव पुरस्कार वाघोड ता रावेर जि जळगाव येथील जेष्ठ वहीगायन लोककलावंत शाहीर रघुनाथ धनु महाजन , शाहीरी क्षेत्रातील स्व शाहीर दिलिप सखाराम जोशी स्मृती जीवन गौरव पुरस्कार नगरदेवळ्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांना तर तमाशा क्षेत्रातील स्व. नथ्थुभाऊ सोनवणे (भोकरकर) जीवन गौरव पुरस्कार एकलग्न ता एरंडोल येथील जेष्ठ तमाशा कलावंत शाहीर बारकु पिराजी जोगी यांना जाहीर करण्यात आला मानपत्र, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कारर्थी लोककलावंताचा सन्मान करण्यात येणार आहे.
संमेलनासाठी खान्देशातील मोठ्या संख्येने लोककलावंत या संमेलनात सहभागी होणार असुन कोवीड प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून संमेलनाचे आयोजन होत आहे. शोभा यात्रा, उद्घघाटन सोहळा, परिसंवाद, पुरस्कार वितरणासह वहीगायन लोक कलेचा जागर या संमेलनात होणार आहे. सकाळच्या संत्रात सकाळी ११वा या संमेलनाला प्रारंभ होणार होणार असून पहिल्या सत्रात परिसंवाद व वहीगायन लोककलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे सायंकाळी 4.00वा शोभायात्रा निघणार आहे तर मुख्य सोहळ्याचे उद्घघाटन सोहळा सांयकाळी ५.३०ला मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न होईल.
लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील कार्यरत लोककलावंची मध्यवर्ती संघटना म्हणून खान्देश लोककलावंत विकास परिषदेची स्थापना करण्यात आली असून यात वहीगायन लोककला सोबतच खान्देशी तमाशा, शाहीरी, गोंधळ, वाघ्यामुरळी, सोंगाड्या पार्टीसह गावगाड्यातील वासुदेव, पोतराज, कानबाई, भगत भोप्या, डांग, अदी खान्देशी लोककला प्रकारातील पाच हजार लोककलावंत खान्देश लोककलावंत परिषदे मधे संघटीत होऊन कार्य करीत आसल्याचे परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले. खान्देशात प्रथमच वहीगायन लोककला संमेलनाचे आयोजन होत असुन कोविड प्रतिबंधात्मक सर्व नियमाचे पालन करून हे संमेलन होत असल्याचे खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी कळविले आहे