जळगाव (प्रतिनिधी): येथील ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात दिनांक 16 आणि 17 फेब्रुवारी 2022 या दोन दिवसांसाठी विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिनांक 16 फेब्रुवारी 2022 रोजी इकरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह सर यांच्या हस्ते चेस व कॅरम स्पर्धांचे उद्घाटन तसेच प्रमुख पाहुणे हाजी निसार अहमद व संस्थेचे सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक साहेब यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
खेळांच्या स्पर्धांमध्ये चेस, कॅरम, लेमन स्पून, सॅक रेस, बॅडमिंटन, क्रिकेट, 100 मीटर धावणे, इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रसंगी ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार साहेब, इकरा थीम महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. चांद खान सर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. इरफान शेख व इतर सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या खेळांच्या आयोजनासाठी प्राध्यापक अजीम शेख व इतर सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.