तारक मेहता मालिका फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ‘बबिता जी’ च्या पात्रातून प्रसिद्धीस आलेल्या अभिनेत्रीला एका युझरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडत ‘बबिता जी’ ला थेट एका रात्रीची किंमत किती असा प्रश्न विचारला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तारक मेहता मालिका फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ‘बबिता जी’ यांचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर आहेत आणि याच कारणामुळे तिने शेअर केलेला प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच व्हायरल होतं असतात, दरम्यान मुनमून दत्ताने नेहमी प्रमाणे इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, ज्यावर तिच्या फॉलोवअर्सने खूप लाइक्सदेखील मिळाले परंतु एक युझरने खालच्या पातळीचा प्रश्न विचारला. मुनमुनच्या फोटोवर कमेंट करताना युझरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या मुनमून थेट एका रात्रीची किंमत किती असा प्रश्न विचारला.
‘बबिता जी’ ने दिलं यूझरला उत्तर म्हणाली…
‘बबिता जी’ यांनी त्या युझरला चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.तिने उत्तर देतांना म्हटलं आहे की, ‘तुला समजत नाही का. मर्यादेत राहा आणि स्वत:कडे लक्ष दे..विचार केला की तुला ब्लॉक करण्याआधी जरा तुला तुझी मर्यादा दाखवून देते आता निघ इथून.’असं म्हणत समाचार घेतला आहे.
अभिनेत्री मुनमुन बिनधास्त आणि स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. तिचं मत नेहमीच चर्चेत असतं. अनेकदा तिने शेअर केलेल्या फोटोला ट्रोल करण्यात येतं आणि वेळोवेळी ती ट्रोलर्सना उत्तर देखील देत असते.