गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी आज दिनांक १६ बुधवार रोजी सकाळी मुंबईतील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत दुःख व्यक्त करण्यात येतं आहे.
या काळात बप्पी लहारींनी दिले सुपर हिट गाणे
बप्पी लहरी यांच्या काही हिट गाण्यांपैकी ‘याद आ रहा है’, ‘सुपर डान्सर’, ‘बॉम्बे से आया मेरा दोस्त’, ‘ऐसे जीना भी क्या जीना है’, ‘प्यार चाहिए मुझे जीने के लिए’, ‘रात बाकी’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘उह ला ला उह लाला’ ही आणि इतर बरीच गाणी आहेत. 80 आणि 90 च्या दशकातला काळ त्यांनी त्यांच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता.
हिंदीसह त्यांनी बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड गाणी देखील गायली आहेत. आत्तापर्यंत त्यांनी गायन आणि संगीत क्षेत्रातील काम सुरु ठेवलं होतं. 2020 मध्ये ‘बागी 3’ सिनेमातील भंकस हे गाणं त्यांचं हिंदी सिनेसृष्टीतील शेवटचं गाणं ठरलं. बप्पी यांच्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला. 63 व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.