शेअरबाजारात या महिन्यातील सर्वात मोठी वाढ नोंदविली गेली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १७३६.२१ अंशांनी वाढून ५८, १४२.०५ अंशांवर बंद झाला. सोमवारी शेअर बाजार कोसळल्या नंतर दुसऱ्याच दिवशी शेअर बाजार उसळल्याने बाजारात खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी ऊर्जा वित्तीय तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना पसंती दिली.
सेन्सेक्समधील सर्वच ३० कंपन्यांच्या समभागांच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसून आली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ही ३.०३ टक्के म्हणजे ५०९.६५ अंशांनी वाढून १७,३५२.४४ अंशांवर बंद झाला.
रशिया युक्रेन दरम्यानचा तणाव निवळू लागल्याने आणि रुपयाचे वाढलेले मूल्य यामुळे गुंतवणूकदार खरेदीसाठी सरसावल्यामुळे शेअर बाजारात पुन्हा तेजी आली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये वाढ झाल्याचा फायदाही भारतीय शेअर बाजाराला मिळाल्याचे दिसून आला आहे.