जळगाव : दि.११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) चे संस्थापक अध्यक्ष अँड.सिद्धार्थ इंगळे तीन दिवसीय जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान ते जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील मासूचे पदाधिकारी व सहकारी तसेच शिक्षक संघटना यांना भेटणार असुन उत्तर महाराष्ट्रातील ढासाळलेल्या शैक्षणिक व्यवस्थेत बदल घडविण्यासाठी मासु ठोस पाऊले उचलणार आहे.
याबाबत नियोजन व सखोल चर्चा होणार आहे तसेच क. ब. चौधरी जळगाव विद्यापीठ प्रभारी कुलगुरू राज संपुष्टात आणून लवकरात लवकर पूर्णवेळ कुलगुरू नियुक्ती करावी यासाठी शासनाकडे मागणी करणार असुन येणाऱ्या काळात मासु विद्यापीठ अधिसभा निवडणूक आणि विद्यार्थी निवडणुकाला सुद्धा सामोरे जाणार असुन त्याबाबत आढावा बैठक सुद्धा होणार आहे येणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणी करिता अध्यक्ष अॅड सिद्धार्थ इंगळे यांची भेट घ्यायची असेल त्यांनी दौरा समन्वयक मासुचे जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांच्याशी मो.+91 77700 31705 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संस्थापक अध्यक्ष यांच्या सोबत मासुचे कार्याध्यक्ष अँड.सुनिल देवरे,उपाध्यक्ष अँड.प्रशांत जाधव,सचिव अरुण चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. परेश चौधरी तसेच इतर उत्तर महाराष्ट्रचे पदाधिकारी सुद्धा सोबत असणार आहेत.
हे देखील वाचा :
खाद्यतेल यापुढे महागणार नाही, सरकारने उचलले मोठे पाऊल
पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज
धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार
जिओचा सर्वात जबरदस्त प्लॅन! कमी किमतीत मिळतील जास्त डेटा आणि अनेक फायदे