नवी दिल्ली : 2022 सालचा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी सुरू आहे. आरबीआयने जारी केलेल्या फेब्रुवारीमधील बँक हॉलिडेजनुसार, या महिन्यात एकूण 9 दिवस बँका बंद राहतील. मात्र, या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. फेब्रुवारीमध्येही बँकांचा संप असून, त्यामुळे बँकांचे कामकाज दोन दिवस ठप्प राहणार आहे.
देशातील सरकारी बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला दोन दिवसीय बँक संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने ही माहिती दिली आहे. बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ हा संप करण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या त्यांच्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सरकारनेही तयारी सुरू केली आहे.
संपाचे कारण काय?
विशेष म्हणजे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया यांना सरकारने निर्गुंतवणुकीवर स्थापन केलेल्या सचिवांच्या मुख्य गटाने सुचवले होते.
खासगीकरणानंतर कर्मचाऱ्यांचे काय होणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खाजगीकरणापूर्वी या बँका त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (VRS) घेऊ शकतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांसाठीही चिंतेचा विषय आहे.
हे देखील वाचा :
नितेश राणे यांना मोठा दिलासा, ‘या’ अटींवर जामीन मंजूर
तुम्ही किडनी विकाराने त्रस्त आहेत का ? ‘ही’ लक्षणं दिसताचं ; तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्या…
SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस
ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही? जाणून घ्या काय आहेत नियम
12 वीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष्य द्या! आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!
आता ९ दिवस बँका बंद राहणार आहेत
तारखेच्या सुट्ट्या
12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार
13 फेब्रुवारी : रविवार
15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागई-नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)
18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यामध्ये बँका बंद)
19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)
20 फेब्रुवारी: रविवार
26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार
27 फेब्रुवारी : रविवार