कणकवली : भाजप नेते नितेश राणे यांना अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाच्यावतीने 30 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी न्यायालयाने त्यांना काही अटीही घालून दिल्या आहेत.
कणकवली सत्र न्यायालयाने शुक्रवारी नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी तब्येत बिघडल्यामुळे नितेश राणे यांना रुग्णालयात ठेवण्यात यावे, असा अर्ज तुरुंग अधीक्षकांना पाठवला होता. ही मागणी मान्य करत नितेश राणे यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यानंतर न्यायालयाने राणेंना जामीन मंजूर केला.