मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीचे दर देखील आज वाढीने ट्रेड करत आहेत. चांदीचे भाव आज 0.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत.
जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे ?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 48,438 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरातही जोरदार वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.29 टक्क्यांनी वाढून 62,549 रुपये झाला आहे.
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.