‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ बबिता जी सोमवारी हरियाणातील हांसी पोलीस ठाण्यात पोहोचली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दलित समाजावर शेरेबाजी केल्याप्रकरणी नोंदवलेल्या एससी/एसटी कायद्याच्या प्रकरणात तिला तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर हजर राहावे लागल्याचे वृत्त आहे.
पोलिसांनी मुनमुन दत्ताची ४ तास चौकशी केली आणि दलित समाजावर केलेल्या टिप्पण्यांवरून तिची जामिनावर सुटका केली आहे.28 जानेवारी रोजी, हिसारमधील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मुनमुन दत्ताचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला होता.
काय होते प्रकरण…
2021 च्या सुरुवातीला, मुनमुनने तिच्या YouTube चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तिने एक विवादास्पद टिप्पणी केली होती जी थेट अनुसूचित जाती समुदायाला लक्ष्य करते. व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “मी यूट्यूबवर येत आहे, आणि मला चांगले दिसायचे आहे, भंगीसारखे दिसायचे नाही.” हा व्हिडिओ अपलोड होताच मुनमून दत्ता ट्रोल झाली होती.
बबिता जी यांना अटक होण्याची शक्यता होती…
मुनमुन दत्ताचे वकील रजत कलसन यांनी सांगितलं होतं की,हिसारमधील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने बबिता जी ची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. न्यायाधीश अजय तेओतिया यांनी तिचा जामीन फेटाळला, त्यामुळे तिला अटक होण्याची दाट शक्यता आहे.असा ट्रेंड देखील सुरु झाला होता.
या प्रकरणी केवळ हिस्सारवरच दाखल झाली नाही, तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह इतर राज्यांनीही या वादग्रस्त व्हिडिओवर कारवाई केली. यापूर्वी, अभिनेत्रीने यापूर्वी तिच्या हिसार येथील प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला.
यानंतर, तिने उच्च न्यायालयात जाऊन आपली अटक थांबवण्याची विनंती केली, परंतु तिच्या बाजूने काहीही झाले नाही. त्यानंतर मुनमुनच्या वकिलाने हिस्सारच्या एससी/एसटी कायद्यांतर्गत विशेष न्यायालयात खटला दाखल केला. २५ जानेवारीला मुनमुन दत्ताची याचिका फेटाळण्यात आली. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांची माफीही मागितली होती.