नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमधून मोठी बातमी हाती येत आहे. येथील कामेंग सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात गस्ती पथकातील सात जवान दबले गेले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेश येथील कामेंग सेक्टरमध्ये ही भीषण दुर्घटना घडली आहे. जवानांची गस्त सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
कामेंग भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यातच हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील किमान सात जवान अडकल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. रविवारी ही घटना घडली असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बचावकार्यासाठी विशेष विमानाने अधिक कुमक पाठवण्यात आली आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
हे सुद्धा वाचा :
नोकरीची संधी पुन्हा मिळणार नाही? बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती
भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला उडविले, भीषण अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर
LIC चा सुपरहिट योजना! वयाच्या 40 व्या वर्षी मिळेल 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन
रश्मिका मंदान्ना ठरली oops Moment ची शिकार; सोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं? फोटो व्हायरल