मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळी दिनांक ६ रोजी निधन झालं आहे.वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी यांची प्रकृती काल पुन्हा ढासळली होती,त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.मात्र आज सकाळी ८:१२ मिनिटांनी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येतं आहे.
लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झालाय. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांचं वय 93 वर्ष होतं . त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत होती .
सर्वात आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही दुःखद बातमी दिली होती. संजय राऊत यांनी ट्विट करून लता मंगेशकर अमर आहेत… युग संपलं असं म्हटलं होतं.
युग संपले… pic.twitter.com/prMUOK74oW
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022