बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट चा आगामी चित्रपट गंगुबाई काठीयावाडी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात आलिया भट पहिल्यांदाच बोल्ड भूमिका करत आहे. एका सेक्स वर्कर च्या भूमिकेतील अभिनयला चाहत्यांनी तुफान प्रतिसाद देत डोक्यावर घेतले आहे.सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेकांनी कमेंट करून आलियाचा लुक व अभिनयाचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
आलियाचा नवा अंदाज….
बहुप्रतीक्षेत असलेल्या आलिया भट्टच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात आलिया भट मुंबई मधील कामठी पुरा येथील सेक्स वर्कर,माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगण या चित्रपटात गँगस्टर करीम लालाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये आलियाचा बोल्ड लुक, नवा अंदाज सगळ्यांना पाहायला मिळतोय. दमदार अभिनय, डायलॉग मुळे आलिया भट चर्चेत आहे.
चित्रपट फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर कलाकारंना कोरोना झाला होता. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यास प्रचंड वेळ लागला होता. या आधी हा सिनेमा 6 जानेवारी प्रदर्शित होणार होता मात्र आता हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
कोण होत्या गंगुबाई काठीयावाडी…
आलिया भट मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकानुसार गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील राहणारी होती. यामुळेच तिला गंगूबाई काठियावाडी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. कमी वयातच गंगूबाईला वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं. यादरम्यान कुख्यात गुंड गंगूबाईचे ग्राहक झाले. गंगूबाईचा मुंबईतील कामाठीपुरा परिसरात वैश्याव्यवसाय चालत असे.