पुणे : महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला.
सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून वेळीच गाडीत बसविले त्यामुळे सोमय्या थोडक्यात बचावले. सोमय्या यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना महापालिकेतून हुसकावून लावून देण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनं पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवत गाडी पुढे नेली. यावेळी गाडीलाही गराडा घातला गेला होता.