मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. अशातच तिनं सोशल एक व्हिडिओ शेअऱ केला आहे. मात्र तिनं शेअर केलेल्या या व्हिडिओनं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
सारा अली खाननं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारा एका स्विमिंग पूलजवळ आहे. सारासोबत व्हिडिओमध्ये तिची स्पॉट गर्ल दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सारानं पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे.
व्हिडिओमध्ये ती आपल्या स्पॉर्ट गर्लसोबत स्विमिंग पूलच्या बाजूला फोटोसाठी पोज देत आहे. मात्र त्यावेळी साराच्या मनात वेगळीच मस्ती चालू होती. त्यानंतर सारानं भलतच काहीतरी केल आणि ते कॅमेरामध्ये कैद झालं.व्हिडिओमध्ये सारानं तिच्यासोबत असलेल्या स्पॉर्ट गर्लला अचानकपणे स्विमिंग पूलमध्ये ढकलला. त्यानंतर तिनं सुद्धा पूलमध्ये उडी मारली. तसेच तिनं या व्हिडिओला प्रॅंक व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओला एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, यात काय मजेशीर आहे? तर आणखी एका युजरनं लिहिलं कि, कोणाला पाण्यात असं ढकलून प्रॅंक कसा झाला?
दरम्यान, सारा अली खानचा अलीकडेच ‘अतरंगी रे’ चित्रपट हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच लवकरच ती विक्की कौशल (Vicky Kaushal ) सोबत तिच्या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. पडद्यावर पहिल्यांदाच सारा आणि विक्की एकत्र दिसणार आहे