मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांच्या फायद्याची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत (NPS) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या 14 टक्के योगदानावर करकपातीचा लाभ मिळणार आहे.
सद्यस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी असलेली एनपीएस खात्यावरील करकपात मर्यादा दहा टक्के आहे. त्यासोबतच केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना आधीच 14 टक्के कर कपातीच्या मर्यादेचा लाभ मिळत आहे. सरकारने केलेल्या या घोषणेमुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पण आता योगदानावरील सूट 14 टक्के करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
नियोक्त्याच्या योगदानावर जी कर वजावट मिळते ती 80 सीच्या सवलतीव्यतिरिक्त मिळते. एनपीएस पेन्शन योजनेतील ग्राहकांची संख्या 4.63 कोटी इतकी असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 24 टक्क्यांनी अधिक असल्याचे आर्थिक पाहणीत आढळून आले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांना फक्त 10 टक्के कर लाभआहे. नॅशनल पेन्शन सिस्टम खात्यांमधील गुंतवणूक आयकर कायदा 1961 च्या तीन वेगवेगळया कलमांतर्गत कर लाभासाठी पात्र आहे. आर्थिक वर्षात एनपीएस मध्ये दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कलम 80CCD(1) अंतर्गत वजावटी चा लाभ उपलब्ध आहे. ही वजावट कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांच्या एकूण मर्यादेत येते. एन पी एस वर कलम 80 सी वजावटीवर अतिरिक्त कर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. या अतिरिक्त वजावट कलम 80CCD(1b) अंतर्गत रुपये पन्नास हजार पर्यंत उपलब्ध आहे. एनपीएस टियर 1 खात्यामध्ये गुंतवणूक करून कोणताही करदाता 50 हजार रुपयांपर्यंतचे अतिरिक्त वजावट मिळवूशकतो.
हे देखील वाचा :
असदुद्दीन ओवेसींच्या वाहनावर गोळीबार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या
इंटरनेटशिवाय फक्त 2 मिनिटांत तुमचा PF शिल्लक जाणून घ्या, ‘ही’ आहे सोपी टिप्स
Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही
या विभागात 10वी, 12वी पाससाठी तब्बल 3847 पदांची मेगा भरती सुरूय, पगार 81000