मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊ लागल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशातच आता पालकांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. कारण वाढत्या डिझेल दरवाढीने आणि कर्मचाऱ्यांचे वाढते पगार आणि 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असताना आता स्कूल बसची 30 टक्के भाडेवाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रुग्ण संख्या कमी होत असताना 24 जानेवारीपासून पुन्हा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बस सुद्धा 10 फेब्रुवारी पासून पूर्णपणे सुरू होत आहेत. मात्र, स्कूल बसच्या आधीच्या शुल्कामध्ये 30 टक्के शुल्क वाढ करण्याचा स्कूल बस मालक संघटनेने ठरवले आहे
राज्य सरकारने स्कूल बसचा 2 वर्षचा रोड टॅक्स जरी माफ केला असला तरी वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार 50 टक्के आसन क्षमतेने स्कूल बस सुरू होत असल्याने 30 टक्के भाडे वाढ करणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेने करणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मुलांना स्कूल बसने शाळेत पाठवायला सुरू करणार असाल तर तुम्हाला 30 टक्के अधिकचा शुल्क मोजावे लागणार आहे. राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. मागील दोन वर्षापासून या स्कूल बस अनेक ठिकाणी बंद आहेत. स्कूल बस पुन्हा एकदा शाळा सुरु झाल्यानंतर सुरू होत असताना मेंटेनन्स खर्च कर्मचाऱ्यांचे वाढते पगार हे सगळं विचारात घेता स्कूल बसने शुल्क वाढ करायचे ठरवले आहे.
हे देखील वाचा :
अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा 43-इंचाचा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या
इंटरनेटशिवाय फक्त 2 मिनिटांत तुमचा PF शिल्लक जाणून घ्या, ‘ही’ आहे सोपी टिप्स
Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही
या विभागात 10वी, 12वी पाससाठी तब्बल 3847 पदांची मेगा भरती सुरूय, पगार 81000