सविस्तर असे की, बोदवड तालुक्यातील हिंगणे येथील १५ वर्षीय वैभव गजानन पाटील हा विद्यार्थी दिनांक १ फेब्रुवारी २०२२ रोजी शाळेत नेहमी प्रमाणे शाळेत गेला मात्र घरी उशिरा पर्यंत आला नसल्याने घरच्यांनी त्याचा गावातील लोकांच्या मदतीने शोध घेतला मात्र सर्वत्र तपास करूनही वैभव आढळून न आल्याने वैभवच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठात गुन्हा नोंदवीला आहे.
फिर्यादीमध्ये वैभवचे काका गोपाळ काशिनाथ पाटील यांनी म्हटलं आहे की वैभवला अज्ञात इसमाने कशाचेतरी आमिष दाखवून पळवून नेले आहे याची आम्हाला खात्री झाली आहे.
वैभव गजानन पाटील, वय वर्ष १५, रंग – गोरा, उंची – ५फूट,केस काळे बारीक,शरीराने सडपातळ,चेहरा लांबट, नाक सरळ,अंगात पांढरा हाफ शर्ट,खाकी रंगाची फुल पॅन्ट घातली आहे.