मुंबई । काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने शॉपिंग मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला विविध स्तरांतून विरोध सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज विरोधानंतर निर्णय बदलल्यास वाईट वाटण्याचे कारण नाही, असे वक्तव्य केले. यावरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. वाईनच्या निर्णयावरून सरकारची अब्रू जात आहे. हे शरद पवार यांच्या लक्षात आले आहे. या सरकारमधील नेत्यांना शहाणपण असेल तर ते निर्णय मागे घेतील, अशी टीका फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी वाईन संदर्भात एक वक्तव्य केले. आता शरद पवार याच्याही लक्षात आणलेले आहे कि वाईनचा निर्णय हा चुकीचा आहे. समाजातील सर्व स्थरातून ता निर्णयाला प्रचंड स्वरूपात विरोध केला जात आहे. या निर्णयामुळे सरकारची अब्रू जात आहे. वाईन कंपन्यांशी जे काही डीलिंग करून जोकाय हा निर्णय घेतला गेला. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
या सरकारमधील नेत्यांना शहाणपण असेल तर ते वाईनचा निर्णय मागे घेती नाही तर आम्ही जनतेमध्ये जातच आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असा भाजपचा संकल्प आहे, असे फडणवीस यांनी यावेळी म्हंटले.