माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने ‘योद्धा पुन्हा मैदानात’ अशा अशायाचे पोस्टर्स सोशल मीडियात झडकत आहेत.
योद्धा पुन्हा मैदानात…..!
शरद पवारांच्या हातात ‘गदा’ असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असून या फोटोत शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील दिसत आहे, यात योद्धा पुन्हा मैदानात अशी टॅग लाईन वापरण्यात आली आहे.
योद्धा ये महान हैं,
समय ये बलवान हैं।
हर अर्जुन का सारथी ये,
इसकी पहचान हैं। असंही एका सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये वाचायला मिळत आहे.
शरद पवारांच्या ‘या’ प्रसंगाची देखील खूप चर्चा
१८ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले होते. हॉलिजनच्या प्रकाशात दिसणाऱ्या पावसाच्या सरी,त्यातूनच जेष्ठ नेते शरद पवारांनी प्रचारानिमित्त भिजतच केलेले पावसातील भाषण ऐतिहासिक ठरले होते.८० वर्षाच्या या योध्याने सर्वांनाचं अवाक करून टाकले होते या प्रसंगाचे देखील खूप चर्चा झाली होती.