जळगाव – चार रुग्णांना चार फळ देऊन फोटोशूट करून इव्हेंट करण म्हणजे रुग्णसेवा नव्हे मंत्रिपद असताना केवळ निधीच्या अन रुग्णांना मदतिच्या गप्पा होत असतील तर मतदार मूर्ख नाही, हाती शिंगाडे घेऊन घेऊन मंत्रिपद मिळविले, आणि पद मिळताच वाघाची मांजर कशी होते, हे मतदारसंघाने अनुभवले आहे, आम्ही पद नसताना ‘नेकीं कर दारियामे डाल’ या युक्तीनुसार समाजकार्य केले, केवळ शेवटची सहा महिने दिवसातून पाच भूमीपूजन केली नाही, साडेचार वर्ष काहीच न करता जर निवडून येण्याची स्वप्न बघा, पण मतदाराला गृहीत धरू नका, समाजकारण करायला पक्षाची गरज लागत नाही, त्यामुळेच तर आम्ही स्वबळावर लढण्याची ताकद ठेवतो, युती, आघाडीच्या चिंतेत कामे न करणारेच असतात, स्वतः टपरीवरून माँलमध्ये गेलं आणि कार्यकर्त्यांना टपरीवर आणलं, केवळ भाषण करून मनोरंजन करण्यापेक्षा कामे केली असती तर ठेवीदार, आशा लावून बसले नसते, आणि शेतकरी मदतीसाठी रुसले नसते.असे जळगाव ग्रामीण मतदार संघात मतदारांशी संवाद साधतांना लकी अण्णा टेलर यांनी म्हटले आहे.