राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माहिती देतांना सांगितलं आहे की , राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही पोलीसभरतीची प्रक्रिया राबविली होती. यामध्ये ५ हजार ७०० पदे भरलेली होती. आता दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २०० पदे लवकरच भरली जाणार आहेत.
८७ पोलीस स्टेशनचे नव्याने बांधकाम
राज्यभरात ८७ पोलीस ठाण्यांच्या इमारतींची नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये नगर जिह्यातील राहुरी, नेवासा व पाथर्डी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद होईल. मार्चनंतर नव्याने घरबांधकामाची कामे मार्गी लागतील. नगर जिह्यातही पोलिसांचा घरांचा प्रश्न मार्गी लागेल,’ असे त्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा….
10वी, 12वी पाससाठी सरकारी नोकऱ्यांची संपूर्ण यादी येथे पहा, बंपर भरती सुरूय
सुवर्णसंधी.. इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती, अर्ज कसा करावा? जाणून घ्या
Flipkart वर 50 इंचाचा ‘हा’ स्मार्ट टीव्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये 8700 जागांसाठी मेगा भरती ; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या
नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गृहमंत्री वळसे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.