देशातील सर्वसामान्य गोर गरीब नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवित असते त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने आरोग्य सेवा मिळण्यासाठी एक योजना राबवत आहे. या योजनेत लाभार्थ्याला थेट ५ लाख रुपये पर्यंत खर्च असलेला उपचार मोफत मिळतो. या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपचार मिळून त्यास आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकारने ‘आयुष्मान भारत योजना उपलब्ध केली आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये जणून घ्या
1. या योजनेला केंद्र सरकारचे संपूर्ण अर्थ साहाय्य आहे, त्याचे सर्व पैसे सरकार स्वतः देते .
2. या योजनेअंतर्गत, तुम्ही आयुष्मान योजनेत सूचीबद्ध खाजगी आणि सरकारी रुग्णालयांचा लाभ घेऊ शकता.
3. या योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा मोफत दिली जाते.
4. कुटुंब लहान असो वा मोठे, या योजनेचा लाभ समान प्रमाणात दिला जातो.
सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आयुष्मान भारत कार्ड सुरू केले आहे.आयुष्मान कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. यासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. या योजनेअंतर्गत पात्रता तपासण्याचा मार्गही राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानेच सांगितला आहे.
मात्र, त्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. अनेकजण दुसऱ्याच्या नावाने कार्ड काढून सुविधांचा लाभ घेत आहेत. तुमच्यासोबतही अशा प्रकारची फसवणूक झाली असेल, तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता.
तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का, तपासा
नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीने सांगितल्या प्रमाणे तुम्ही ऑनलाइन जाऊन तुमची पात्रता तपासू शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही ते तपासा.
1. सर्वप्रथम पीएम जन आरोग्य mera.pmjay.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. येथे तुम्हाला लॉगिन करण्याचा पर्याय मिळेल. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सारखी सामान्य माहिती विचारली जाईल. ते भरा आणि कॅप्चा कोड टाका.
3. यानंतर तुम्हाला तुमचा प्रांत आणि जिल्हा प्रविष्ट करावा लागेल.
4. हे केल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे आणि आयडी क्रमांक निवडण्यास सांगितले जाईल. असे केल्यावर सर्च वर क्लिक करा.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर पीएम आरोग्य योजनेद्वारे आयुष्मान कार्ड जारी केले जाईल.