मुंबई/जळगाव : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेसह धुक्याचा प्रादुर्भाव दिसून येईल आणि कडाक्याची थंडी जाणवेल. दरम्यान, पुढील दोन दिवस असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मंगळवारी राज्यात ११ ठिकाणी पारा १० अंश सेल्सियसपेक्षा खाली घसरला होता. या कडाक्याच्या थंडीचा गव्हाला फायदा होणार असला तरी तरी उन्हाळी कांदा आणि द्राक्ष पिकांना धोका निर्माण झाला आहे.
28 जानेवारीनंतर हवामानात बदल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही राज्यात थंडीचा कडाका जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या सर्वच भागात कडाक्याची थंडी असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसून येत आहे. त्याचवेळी राज्यात काही ठिकाणी ढगाळ ढगाळ धुके राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रदूषणाची पातळीही वाढली आहे.
अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तानकडून आलेल्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम म्हणून उत्तर भारतात ढगाळ वातावरणासह पाऊस, बर्फ पडणे सुरू होते. याच दरम्यान भारतात वायव्येकडून आग्नेयेकडे ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. हा वेगही कायम असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. लागाेपाठ दोन पश्चिमी चक्रावात तयार हाेण्याच्या दरम्यानचा कालावधी जास्त आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा मुक्कामही वाढला.
हे सुद्धा वाचा :
सुवर्णसंधी.. इंडियन ऑइलमध्ये बंपर भरती, अर्ज कसा करावा? जाणून घ्या
Jio-Airtel-Vi चा धमाका! जाणून घ्या कोणाचा प्लान आहे बेस्ट
रिपब्लिक डे सेल 2022: सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 500 रुपयांत खरेदी करा, आज शेवटचा दिवस
झणझणीत तडका ; पुष्पा चित्रपटाचा मराठी ट्रेलर पाहिला का ?
प्रमुख शहरांत घसरलेले तापमान
शहर किमान
रानवड ३.९
ओझर ४.०
निफाड ४.५
नाशिक ६.३
अहमदनगर ७.९
पुणे ८.५
जळगाव ८.६
मालेगाव ८.८
औरंगाबाद ८.८
महाबळेश्वर ८.८
बुलढाणा ९.२
गोंदिया १०.२
नागपूर १०.६
परभणी १०.८
सोलापूर ११.२
अकोला ११.०
वर्धा ११.५