पहूर, ता. जामनेर – पहूर पेठ येथील गृप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदासाठी दिनांक तीन जुन रोजी मतदान घेण्यात आले. यात शाम सावळे यांना दहा मते घेऊन विजयी झाले. तर पराभूत उमेदवार महेराज बी. शेख बिस्मिल्ला यांना आठ मते मिळवून त्यांचा दोन मतांनी पराभव झाला.
पहूर पेठ चे उपसरपंच रवींद्र मोरे यांचा एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज तीन जुन रोज उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात सत्ताधारी भाजपा तर्फे महेराज. बी. शेख बिस्मिल्ला यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शाम सावळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार निवडणूक होऊन यात शाम सावळे यांनी दहा मते विरूद्ध सात अशा तीन मतांनी शाम सावळे यांचा विजय झाला. या निवडणुक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच निताताई पाटील यांनी काम पाहिले. तर निवडणूक सहायक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सी. एच. वाघमारे यांनी काम पाहिले.
भाजप चे दोन फुटीर सदस्य कोण? – गेल्या वर्षी झालेल्या पहूर पेठ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रनित पॅनलचे लोक नियुक्त सरपंच व नऊ सदस्य असे एकूण दहा तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रनित पॅनलचे आठ सदस्य विजयी झाले होते. मात्र आज रोजी उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप चे दोन फुटीर सदस्यांनमुळे आज तीन मतांनी शाम सावळे यांची निवड झाली. शाम सावळे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी जि.प.कृषी सभापती प्रदिपभाऊ लोढा, माजी जि.प.सदस्य कैलास पाटील, शैलेश पाटील, ईका पैलवान, ईश्वर बारी, शांताराम पाटील, चांदखा तडवी, शरद सोनार, अरूण घोलप, वसीम शेख नसीम, कैलास गोंधनखेडे, यांच्या सह कार्यकर्ते यांनी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.