नवी दिल्ली : सोने-चांदी खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे आज चांदीचा दर वाढला आहे.
जाणून घ्या आजचा दर काय आहे
आज सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आजच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यासह सोने 48 हजारांच्या जवळ पोहोचले आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये सोने 47,925 प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. दुसरीकडे, चांदी 0.22 च्या वाढीसह 63,160 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,840 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.