जळगाव: राज्यातील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकीची दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली. आज याचा निकाल जाहीर केला जात.
राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
बोदवड नगरपंचायतीच्या १७ जागासाठी पार पडलेल्या मतदानात तीन जागांचे निकाल जाहिर झाले असून यात राष्ट्रवादीने तीन, तर शिवसेनेने एका जागेवर विजय मिळविला आहे.