पुणे, (प्रतिनिधी)- MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार येत्या 23 जानेवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
हे सुद्धा वाचा…धक्कादायक! एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, पुण्यातील घटना
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!३० मिनिटांपेक्षा जास्त काम केल्यास मिळेल ओव्हरटाईम, कधी लागू होतील नियम?
नोकरीची संधी….केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ६४७ पदांची बंपर भरती
ESIC मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 80000 पेक्षा जास्त
दरमहा मिळेल 5,000 रुपये पेन्शन, करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक
राज्य सेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 2 जानेवारीला होणार होती. मात्र, कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उंमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याबाबतच्या निर्णयामुळे एमपीएससीने(MPSC) अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती,त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर करून ही परीक्षा 23 जानेवारीला होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान दि. 2 जानेवारीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राच्या आधारे परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाईल.तर कमाल वयोमर्यादा ओलांडल्याने वाढीव मुदतीत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या प्रणालीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षा कक्षात प्रवेशासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून मुद्रित केलेले मूळ प्रवेशपत्र परीक्षार्थिनी सोबत असणे आवश्यक राहील.