जळगाव- श्री राजपूत करणी सेनेने फक्त राजपूत समाजासाठीच मर्यादित न राहता इतर समाजबांधवांना सुध्दा सोबत घेऊन विविध क्षेत्रात सर्वांसाठी विकासाचे कार्य करावे. सर्व समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन श्री राजपूत करणी सेनेचे राज्याध्यक्ष श्यामसिंग ठाकूर यांनी केले.
श्री राजपूत करणी सेनेच्या नूतन पदाधिकऱ्यांची नियुक्ती व त्यांच्या सत्कार समारंभ कुसुंबा येथे झाला. याप्रसंगी श्यामसिंग ठाकूर बोलत होते.
या संघटनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांची आता राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उज्ज्वला पवार, महिला विभागाच्या राज्य संपर्क प्रमुखपदी मनीषा पाटील, युवती प्रदेश अध्यक्षपदी वैशाली साळुंके, महिला प्रदेश संघटकपदी आशा राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक कार्य करीत असताना सर्वांना सोबत घेऊन संघटन वाढविण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही प्रवीणसिंग पाटील यांनी दिली. महिलांना समान हक्क देण्यावर भर देण्यात यावा. संघटनेतर्फे महिला सक्षमीकरण च्या कार्याला प्राध्यान्य देण्यात येत आहे, अशी माहिती महिला प्रदेशाध्यक्षा नंदा राजपूत यांनी दिली.
…. पृथ्वीराज चौहान यांचा एकेरी उल्लेख ….
पृथ्वीराज चौहान यांच्या जीवन कार्यावर चित्रपट येत आहे. परंतु, या चित्रपटाच्या शीर्षकात ‘पृथ्वीराज चौहान ‘ एवजी फक्त ‘ पृथ्वीराज ‘ असा उल्लेख करण्यात येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शकाने पृथ्वीराज चौहान यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून सत्य इतिहास दाखविण्यात यावा. अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्याम सिंग ठाकूर यांनी इशारा श्याम सिंग ठाकूर यांनी दिला.
प्रा.डॉ.विश्वजित सिसोदिया, काँगेसचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र प्रमुख दिलीपसिंग पाटील, गुलाबसिंग ठाकूर, काशिनाथसिंग ठाकूर, वैशाली साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विलाससिंग पाटील, तर सूत्रसंचालन आय्याज मोहसीन यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष विठ्ल सिंग मोरे, युवकचे अध्यक्ष बापुसिंग राणा, भावलालसिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच.खंडळकर, जिल्हा संघटक गणेश राणा, आशिषसिंग हाडा, मयूर राजपूत, अतुल राजपूत, नीलेश सिसोदिया, प्रशांतसिंग ठाकूर, सुखदेव साळुंके आदी उपस्थित होते.