जालना : राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर स्कुल, कॉलेज बंद करण्यात आले आहे. मात्र पंधरा दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहे. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के लसीकरण केले आहे. स्कुल कॉलेज बंद असल्यामुळे आता घरोघरी जावून लसीकरण करणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
लसीकरणाचे महत्व खूप मोठे आहे,लसीकरणमुळे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील कोरोनाबाधितांपैकी 86 ते 87 टक्के लोक होम क्वारटाईन आहेत. त्यामुळे लसीकरण करणे महत्वाचं आहे. शाळेच्या बाबतीत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. मुलांचे बाधीत होण्याच प्रमाण कमी आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मात्र पंधरा दिवसात शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. कोरोना आणि ओमिक्रॉनबाबत लोकांच्या मनात भीती कमी झाली आहे. पण लोकांनी स्वत: सतर्कता बाळागावी, असं राजेश टोपे म्हणाले.
नियम सर्वांना सारखेच
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भात बोलताना राजेश टोपे यांनी रुग्णालयाला दररोज मेडिकल बुलेटिन जारी करावं, असं सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात झालेल्या गर्दी संदर्भात विचारलं असता सर्वांना नियम सारखे आहेत, गर्दी सर्वांनी टाळावी. राजकिय नेते , व्यापारी असेल किंवा सामान्य लोक असेल त्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं राजेश टोपे म्हणाले.