इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिसची पदांच्या एकूण 570 जागांसाठी भरती करणार आहे. यासंबंधीची सूचना iocl.com वर अपलोड करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 15 जानेवारी 2022 पासून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयात आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी (ITI/ NCVT/ SCVT)असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
३१ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण आणि २४ वर्षांपर्यंत असावे.
हे सुद्धा वाचा…
ESIC मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 80000 पेक्षा जास्त
नोकरीची संधी….केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ६४७ पदांची बंपर भरती
खुशखबर…आयटी कंपनी इन्फोसिस करणार 55,000 जणांची नोकरभरती
जळगाव महानगरपालिकेत विविध पदांची भरती
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेतून होणार आहे. यामध्ये १०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह प्रश्न विचारले जातील. यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. प्रश्न हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये असतील. यामध्ये उमेदवारांना ४० टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. मागासवर्गीय उमेदवरांसाठी ३५ टक्के गुण आवश्यक आहेत. निवड झालेल्या उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १५ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा