जळगाव : कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनपासून म्हणजेच २२ महिन्यांपासून भुसावळ जंक्शनवरून धावणाऱ्या भुसावळ-पुणे (हुतात्मा एक्स्प्रेस), भुसावळ-नागपूर, भुसावळ-कटनी, भुसावळ-देवळाली, भुसावळ-मुंबई या पॅसेंजर बंद आहे. दरम्यान, या पुन्हा सुरू कराव्या, यासाठी डीआरएम कार्यालयाने महाव्यवस्थापक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
यापूर्वी रेल्वे प्रशासनाने भुसावळ-इगतपुरी, इटारसी व बडनेरा मार्गावर मेमू गाडी सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसाेय काही प्रमाणात दूर झाली. दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनपासून म्हणजेच २२ महिन्यांपासून भुसावळ-देवळाली शटल बंद होती. ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनावर दबाव होता. सोमवारी या पॅसेंजरच्या जागेवर मेमू गाडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. कारण, इगतपुरीला उतरून तेथून इतर वाहनांनी कसारा व तेथून लोकलने मुंबईला जाता येईल. दरम्यान, इगतपुरी मेमू पाठोपाठ भुसावळ-पुणे ही हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आहे. नाशिक, कल्याण, पनवेल, लाेणावळा येथे जाण्यासाठी ही गाडी सोयीची आहे. सध्या एसटीचा संप व खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी केलेली भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा रुळावर येणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव डीआरएम कार्यालयातून रवाना झाला आहे.
हे देखील वाचा :
नावात राष्ट्रवादी असलं म्हणजे…, देवेंद्र फडणवीसांची टीका
रस्ता सुरक्षेसाठी नितीन गडकरींचा मोठा निर्णय, ‘या’ गाड्यांना 6-एअरबॅग्ज!
देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर.. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यासाठी मिळणार शिधापत्रिका
गृहिणींना दिलासा देणारी बातमी ; खाद्य तेल स्वस्त !
असा पाठवला प्रस्ताव : भुसावळ डीआरएम कार्यालयाने मुंबई येथे जीएम कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावात भुसावळ येथून पूर्वीप्रमाणे भुसावळ-मुंबई, देवळाली, वर्धा, नागपूर, कटनी आणि भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या परतीच्या मिळून १२ गाड्यांची मागणी केली आहे.