जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कालच्या तुलनेपेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या ४ ने घटली आहे. आज जिल्ह्यात दिवसभरात २६६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरासह भुसावळ चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यात संसर्ग वाढलेला दिसून आला
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात-१११, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-७१, अमळनेर-६, चोपडा-३५, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-१, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण २६६ बाधित रूग्ण आढळले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ लाख ४४ हजार ४२८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ३३३ रूण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार ५१५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८० बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.