फ्लिपकार्ट व ऍमेझॉनने अग्रणीय इ-कॉमर्स कंपन्यानी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीप्रमाणेचं २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची मोठी ऑफरची घोषणा केली असून या सेलच्या माध्यमातून ८० टक्क्यापर्यंत सूट देण्यात आली आहे.फ्लिपकार्ट व ऍमेझॉन नेहमीच आपल्या ग्राहकांना भन्नाट ऑफर देऊन चकित करीत असतात, या वर्षीच्या ‘रिपब्लिक डे’ सेल मधूनही ग्राहकांना मनमुराद शॉपिंग करता येणारं आहे.
फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनने ‘रिपब्लिक डे’ 2022 सेलची घोषणा केली असून Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेल 17 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत सुरू राहील . विशेष Amazon प्राइमचे सदस्य या सेलचा 24 तास आधीपासून लाभ घेऊ शकतील.
Amazon प्राइमच्या सदस्यांना विशेष सवलत देत 16 जानेवारी 2022 पासून या सेलचा लाभ घेऊ शकतील अशी मुभा कंपनीच्या वतीने दिली आहे.तर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल देखील 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 22 जानेवारीला संपणार आहे. फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य यांना देखील कंपनीने सेलचा लाभ घेण्यासाठी 16 जानेवारी म्हणजेज २४ तास अगोदर वेळ दिला आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ग्राहकांना यावेळी अनेक ऑफर दिल्या जातील. या सेलमध्ये, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% ची सूट दिली जाईल.
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये, Poco, Apple, Realme, Samsung आणि इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळणार आहे. याशिवाय, स्मार्टवॉच, इयरबड्स, लॅपटॉप यांसारखी इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे 80% पर्यंत सवलतीत उपलब्ध होणार आहे.
भोसरी जमीन प्रकरणात मंदाकिनी खडसेनां दिलासा
दरम्यान Amazon सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड 10% सूट मिळणार आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉच, इअरबड्स आणि इतर उत्पादनेही अतिशय स्वस्तात विकली जातील. यामध्ये तुम्ही एक्सचेंज आणि बँक ऑफर्सचाही लाभ ग्राहकांना मिळणार आहे.