मुंबई । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे सोने 48 हजार रुपयांच्या खाली तर चांदीचा भाव 62 हजारांच्या खाली आला आहे. जर आपण आजच्या किंमतीबद्दल बोललो, तर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.01 टक्क्यांच्या किंचित वाढीसह ट्रेड करताना दिसत आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 0.08 टक्क्यांनी वाढला आहे.
आज सोने आणि चांदी किती स्वस्त झाले ते पहा
आज, MCX फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.01 टक्क्यांनी वाढून 47,659 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.08 टक्क्यांच्या वाढीसह 61,030 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.