नवी दिल्ली : येणाऱ्या वर्षात देशातील आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी देत आहे. एका व्यवसायिक आहवालानुसार या वर्षी भारतातील आयटी क्षेत्रात नव्याने अडीच लाखांच्या आसपास नोकऱ्या उपलब्ध होतील. यातच अग्रगण्य भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसने आणखी एक घोषणा केली आहे.
या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत 5 हजार 809 कोटी रुपयांचा नफा जाहीर केल्यानंतर, भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी Infosysने मोठी घोषणा केली. कंपनीच्या जागतिक पदवीधर भरती कार्यक्रमाचा भाग म्हणून आर्थिक वर्ष 2022मध्ये कंपनी 55हजार नव्या कर्मचाऱ्यांना संधी देणार आहे. म्हणजेच Infosys फ्रेशर्सची मोठ्या प्रमाणात भरती करण्याची योजना आखत आहे.
विविध वृत्तसंस्थांना तपशील देताना, मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हणाले की, आयटी फर्मने संपादन आणि विकासामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देणं सुरू ठेवलं आहे.आणि बाजारतील वाढीच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी देण्यासाठी आर्थिक वर्ष 22 साठी जागतिक पातळीवर नोकरभरती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये जवळपास 55 हजार नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं जाहीर केलंय.