मुंबई : रिलायन्स जिओ एक खुशखबर आहे. कारण रिलायन्स जिओकडे यूजर्ससाठी स्वस्त प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. तुम्ही जर जिओफोन वापरत असाल तर तुम्हाला कंपनीच्या प्लान्समध्ये कमी किंमतीत जास्त फायदे मिळतील. जिओकडे यूजर्ससाठी ८९९ रुपयांचा स्वस्त प्रीपेड प्लानमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे मिळतात. हा प्लान खास जिओफोन यूजर्ससाठी आहे.
कंपनीच्या Jio Phone All in One Plans लिस्टमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा ९१ रुपयांचा प्लान आहे. यानुसार, १२ वेळा रिचार्ज खर्च केल्यास एकूण १०९२ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. मात्र, कंपनीकडे असा एक प्लान आहे, ज्याद्वारे तुम्ही १९३ रुपयांची बचत करू शकता. कंपनीच्या या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जिओचा ८९९ रुपयांचा प्लान
या प्लानसोबत कंपनी यूजर्सला तब्बल ३३६ दिवसांची वैधता देत आहे. या प्लानमध्ये दर २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा देत आहे. म्हणजेच, यूजर्सला १२ वेळा एकूण २४ जीबी डेटा मिळेल.
या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय प्लानमध्ये दर २८ दिवसांच्या वैधतेसाठी ५० एसएमएस मिळतात. म्हणजेच दर २८ दिवसांनी २ जीबी डेटासह ५० मोफत एसएमएसचा फायदा मिळेल.
अन्य बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर या Jio Prepaid Plan मध्ये यूजर्सला जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. मात्र, लक्षात ठेवा की हा प्लान खास जिओफोन यूजर्ससाठी आहे.