भुसावळ : आज तुम्ही रेल्वेनं बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाद्वारे जळगाव-भुसावळ दरम्यान चौथ्या लाइनसाठी रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले आहे. तर बऱ्हाणपूर स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकिंग पॅनलच्या कामासाठी आज बुधवारी (दि.१२) मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे भुसावळ-इगतपुरी मेमू ही गाडी तिसऱ्याच दिवशी रद्द करावी लागली. तर अप-डाऊन मार्गावरील मिळून एकूण २१ गाड्यांना ठिकठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
आज बुधवारी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भादली-जळगाव दरम्यान १०.४० ते २.४० वाजेदरम्यान चार तासांचा ब्लॉक घेतला आहे. दुसरीकडे उत्तरेकडील मार्गावर दुसखेडा ते सावदादरम्यान सकाळी ९.४० ते दुपारी ३.५० असा ५.३५ तासांचा ब्लॉक असेल. यामुळे रेल्वे दळणवळण सेवा विस्कळीत होणार आहे.
त्यात डाउन मार्गावरील अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस जळगाव स्टेशनवर ११.०५ ते २.४५ वाजेपर्यंत, अहमदाबाद-बरोनी एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस जळगाव स्टेशनवर ११ ते २.४५ थांबवण्यात येईल. मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस म्हसावद स्टेशनवर ११.५५ ते २.५५, गोवा एक्स्प्रेस माहेजी स्टेशनवर १२.१० ते २.४५ पर्यंत, अजमेर-पुरी एक्सप्रेस धरणगावला १२.४५ ते २.५५ पर्यंत, काशी एक्स्प्रेस पाचोऱ्यात १ ते २.४५, एलटीटी-जयनगर गाळण स्थानकावर १.१५ ते २.४५, एलटीटी-गुवाहाटी कजगावला १.३५ ते २.४५ आणि पुष्पक एक्स्प्रेस वाघळी स्थानकावर १.४५ ते २.४५ पर्यंत थांबवण्यात येईल.शिक्षण अन् रोजगार सांभाळून युवकांची भूतदया; पॉकेटमनी, दात्यांच्या मदतीने
अप मार्गावर स्थिती अशी :
नवी दिल्ली-बंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेस सावदा स्टेशनवर १२.३५ ते ३.२०, गोरखपूर-एलटीटी निंभोरा येथे १२.४५ ते ३.२०, अजमेर-हैद्राबाद रावेरला १२.५५ ते ३.२०, लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस वाघोडला १ ते ३.२०, हरिद्वार-एलटीटी एसी बऱ्हाणपूरला १.२० ते ३.२०, लखनऊ-एलटीटी असीरगढ स्टेशनवर १.२५ ते ३.२०, कामायनी एक्स्प्रेस नेपानगरला १.३५ ते ३.२०, श्री गंगानगर-नांदेड गाडी मांडवा स्टेशनवर १.५० ते ३.२०, सिकंदराबाद-हिसार एक्स्प्रेस भुसावळ स्टेशनवर १.२० ते २.४०, गीतांजली भुसावळ स्टेशनवर १.५५ ते २.४५ आणि नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस भुसावळ स्टेशनवर २.४५ ते २.५० पर्यंत थांबवण्यात येईल.