बहुचर्चित बाहुबली चित्रपटात ‘कटप्पा’ ची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे,उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सत्यराज यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
अभिनेता सत्यराज यांचा कोरोना रिपोर्ट आल्यानंतर ते क्वारंटाईन होते. पण आत तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यराज यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. पण आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
सत्यराज यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. परंतु रिपोर्टनुसार त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.