जळगाव : जळगाव जिल्ह्यात आज नवे ८७ बाधित आढळून आले आहे. तर दिलासादायक असं कि आज पुन्हा एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाहीय. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये भुसावळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णानंतर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या १ लाख ४३ हजार १२७ वर गेली आहे. तर त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३१० बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे.
जळगाव शहरात १६, जळगाव ग्रामीण १, भुसावळ तालुका ४०, अमळनेर ०५, चोपडा ६, भडगाव १, धरणगाव १, जामनेर १, पारोळा २, चाळीसगाव ९, मुक्ताईनगर ४ व इतर तालुक्यातील १ असे एकुण ८७ बाधित रूग्ण आढळले आहे.