जळगाव : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यात लोकप्रतिनिधी देखील कोरोनाच्या विखळ्यात सापडत असून अशात भाजपचे संकटमोचन आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून कोरोना प्रतिबंधक चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे.
यापूर्वीही गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांच्या हस्ते कामांचे उद्घाटन होणार होते. मात्र त्यापूर्वी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल आला आहे. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी तातडीने स्वतःला कोरोंटाईन करून घेतले आहे.