मुंबई : राज्यात कोरोनाची दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढ आहे. यात लोकप्रतिनी यांचा देखील समावेश आहे. अशात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरनासृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात येत आहे. खुद्द भारती पवार यांनी याबाबत ट्विटरव माहिती दिली आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांनी कालच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कोरोना प्रसाराबाबत आढावा बैठक घेतली होती.
खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोनाचा संसर्ग
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. गोडसे यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी चाचणी केली होती. हेमंत गोडसे यांना यापूर्वी देखील कोरोना झाला होता. संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे.