हिवाळ्यात यंदा खूपच वातावरणीय बदल होताना दिसत आहेत. यामुळे या दिवसात स्वतःच्या शरीराची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. काही फळांच्या सेवनाने देखील तुम्ही आजराला दूर पळवून लावू शकता. या फळांमध्ये बीट आणि गाजराचा प्रामुख्याने समावेश होतो. चला तर मग जाणून घेऊ बीट आणि गाजरचा रस पिण्याचे आरोग्यासाठी असलेले फायदे
वजन कमी करण्यास उपयुक्त :
बीट-गाजरचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच यातील फायबरमुळे ते प्यायल्यानंतर लवकर भूक लागत नाही.
रक्ताची कमतरता पूर्ण :
गाजर-बीटाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. हा रस रक्तातील हिमोग्लोबिनची उच्च पातळी राखण्यास मदत करतो.
प्रतिकारशक्ती मजबूत होते :
बीट-गाजरचा रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. हा रस प्यायल्याने हंगामी आजारांचा धोका खूप कमी होतो.