मुंबई । एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तर दुसरीडे सराफ बाजारात त्याचे पडसाद पडत असल्याचे दिसून येत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीचे दर महागले आहे. 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 49260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोरोना मुळे जगभरात वाढलेले निर्बंध, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या आर्थिक घडामोडींवर होणारे परिणाम यामुळे सोन्याच्या मागणीला आणखी वेग येऊन दरवाढ होईल अशी शक्यता आहे.
MCX वर वाढले सोन्याचे भाव
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. 0.18 टक्क्यांच्या वाढीसह 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 47,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचं झालं तर आज चांदीच्या दरात 0.12 टक्क्यांनी घसरण झाली असून 61,668 रुपये किलो असा चांदीचा भाव आहे.
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.